Pimpri : सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सुबोध मेडशिकर असे त्यांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादिला त्रास देण्याच्या उद्देशाने सुबोध यांनी दबाव टाकून त्यांचा कार्यालयात मानसिक व लैगिंक छळ करून त्यांचा विनयभंग केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत