लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नाला नकार दिल्यानंतर माझ्याशी लग्न केले नाही तर तुझी बदनामी करेन , तुझे लग्न कसे होते तेच बघतो, अशी धमकी देणाऱ्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल-मे 2022 पासून आज अखेरपर्यंत सुरु होता.

23 वर्षीय तरुणीने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत स्वप्नील कल्याण आंधळे (रा. माधवनगर सांगली) याच्या विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

Yerawada news: येरवडा जेल मध्ये कैद्यांमध्ये दगडफेक व मारहाणीत एक पोलीस हवालदार जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीला लग्नासाठी नकार दिला होता. याच रागातून आरोपीने फिर्यादीचा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे असे प्रकार सुरु केले. पुढे त्याने फिर्यादीला त्यांचे फोटोचे मॉर्फींग करून ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तुझे दुसऱ्याशी लग्न कसे होते तेच बघतो, माझ्याशी संबंध ठेव नाही तर तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली. पाठलाग करून फिर्यादीचा विनयभंग केल्या प्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.