Dighi : लग्नाला नकार दिला म्हणून न्यूड फोटो व्हायरल करत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – लग्नाला नकार दिला म्हणून महिलेचा पाठलाग करत व तिचे न्यूड फोटो नातेवाईकांना पाठवून महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. हा प्रकार 17 ऑगस्ट 2020 ते शनिवार (दि.27) 2023 या कालावधीत दिघी येथे ( Dighi ) घडली.
याप्रकऱणी पीडितेने दिघी पोलीसात रविवारी (दि.28) फिर्य़ाद दिली असून रोहीत कांतीलाल भोसले (वय 34 रा. कोथरूड) याच्यावर विनयभंग व माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dehu Road : दारू पिण्यावरून ज्येष्ठ नागरिकाला दगडाने मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितने आरोपीला लग्नाला नकार दिला होता. याचा राग येवून आरोपीने पीडितेचा वेळोवेळी पाठलाग करत शिवीगाळ व मारहाण केली. याला ही पीडिता दाद देत नसल्याचे लक्षात येताच आरोपीने पीडितेचे न्यूड फोटो पीडितेच्या बहिणीला पाठवत पीडितेची बदनामी केली. यावरून दिघी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Dighi ) आहेत.