Hinjwadi : चेन मार्केटींगचे आमिष दाखवून तरुणाच्या आधार कार्डद्वारे काढले तब्बल सुमारे दीड लाखांचे कर्ज

एमपीसी न्यूज – चेन मार्केटींगचे आमिष दाखवून तरुणा च्या आधार कार्डचा गैरवापर करत त्याद्वारे तब्ब्ल 1 लाख 37 हजार रुपयांचे कर्ज काढण्यात आले. याप्रकऱणी हिंजवडी पोलीस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही फसवणूक 28 जून ते 30 जुलै या कालावधीत हिंजवडी (Hinjwadi) येथील हॉटेल हयात व तमन्ना येथे घडली आहे.

Chikhli : रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या गाडीला काढण्यास सांगितले म्हणून तरुणाला मारहाण

याप्रकरणी हिंजवडी पोलिसाकडे 26 वर्षीय तरुणाने रविवारी (दि.3) फिर्याद दिली असून मोहित गोयेल (वय 32), आकाश शिगळे, गोविंद पाटील व एक महिला आरोपी यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी संगनमत करून हॉटेल हयात येथे बोलावले. तेथे त्यांना चेन मार्केटींगचे आमिष दाखवण्यात आले. यावेळी फिर्यादी यांना जॉबसाठी दिड लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी एवढे पैसे नाहीत असे सांगितले. आरोपींनी फिर्यादीला आधारकार्डची मागणी केली. तसेच आठवड्याला खात्यावर पैसे येतील असे सांगिते.

यावेळी फिर्यादीच्या आधार कार्डद्वारे आरोपींनी विफिन फाईनान्स मधून 1 लाख 37 हजार रुपयांचे परस्पर कर्ज काढले. फिर्यादी यांच्या खात्यात पैसे येताच पुन्हा आरोपींनी फिर्यादींना भेटायला बोलावले. यावेळी फिर्यादीचा फोन घेऊन त्याद्वारे 15 हजार रुपये ,80 हजार व 50 हजार असे करत फिर्यादी यांच्या खात्यावरून तब्बल 1 लाख 45 हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.