Chikhli : रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या गाडीला काढण्यास सांगितले म्हणून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्यात मधोमध थांबलेल्या कारला काढा हे सांगण्यासाठी तरुणाने गाडीचा हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने चौघांनी तरुणाला मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना 31 ऑगस्ट 2023 रोजी चिखली येथील पाटील नगर येथे घडली.

Pimpri : परवाना नसल्यास महापालिका गणेशमूर्ती विक्री स्टॉलवर कारवाई करणार

याप्रकरणी केतन कृष्ण वाघमोडे (वय 22 रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात रविवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अविनाश गायकवाड (रा. चिखली), त्याचा मित्र व दोन महिलांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी जात असताना गल्लीतील रस्त्यावर मोधोमध आरोपी यांनी त्यांची कार लावली होती. फिर्यादी यांना जाता येत नसल्याने त्यांनी गाडीचा हॉर्न वाजवला. याचा राग येवून आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या आईला मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या गाडीचे नुकसान केले. महिला आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या डोक्यात दगड मारत जखमी केले.तसेच माझ्या नादी लागयच नाही तर सर्वांना मारून टाकेन अशी धमकी दिली. चिखली पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.