Pimpri : परवाना नसल्यास महापालिका गणेशमूर्ती विक्री स्टॉलवर कारवाई करणार

एमपीसी न्यूज – गणेश मूर्तीची विक्रीसाठी स्टॉल उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा व्यवसाय परवाना घेणे सक्तीचे आहे. त्याशिवाय स्टॉल टाकल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.

Dehuroad : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

19 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळ, हाऊसिंग सोसायट्या, कॉलनी, वसाहत तसेच, घरोघरी गणेशमूर्ती बसविली जाते. त्यासाठी शहरभरात शेकडो स्टॉल उभारून मूर्तीची विक्री केली जाते. मूर्ती विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होते. शहरातील काही कारखान्यात मूर्ती तयार करून त्याची विक्री केली जाते.

मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यासाठी महापालिकेचा व्यवसाय परवाना असणे बंधनकारक आहे. त्यासाठी 499 रुपये शुल्क भरावे लागते. तसेच, अर्जासोबत जागेचा नकाशा, 100 रुपयांच्या स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड व पॅनकार्डची झेराक्सप्रत जोडावी लागते. परवाना मिळाल्यानंतर 19 सप्टेंबरपर्यंत मूर्तीची विक्री करता येणार आहे. व्यवसाय परवाना असल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून स्टॉलसाठी मंडप टाकण्यास परवानगी दिली जाते. त्यासाठी वाहतूक पोलिसांचाही ना हरकत दाखला जोडणे आवश्यक असते.

पिंपरी (Pimpri) -चिंचवड शहरात गणेशमूर्ती विक्री करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे 193 अर्ज आले आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याशिवाय मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे, असे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.