Dehuroad : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – देहुरोड़ (Dehuroad) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.2) सकाळी पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर केंद्रिय विदयालयासमोर झाला आहे.

Chakan : पोलीसांकडे तक्रार केली म्हणून एकाला मारहाण

याप्रकरणी अक्षय सुनिल गुंड (वय 30 रा. पिंपरी) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून देहुरोड पलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ सागर सुनील गुंड (वय 31) हा त्याच्या दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने पाठीमागून त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. मात्र अज्ञात वाहनाचा चालक तेथे थांबून कोणतीही मदत न करता पळून गेला. यात जखमी झालेल्या तरुणाला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. देहुरोड पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून ते आरोपीचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.