Khed : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. ज्यामध्ये दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्री खेड (Khed) येथील रासे गावात झाला.

Wakad : तीर्थक्षेत्र अरणला ‘अ’ दर्जा मिळवून देणार – अतुल सावे

याप्रकरणी ओंकार नरेंद्र वाघिरकर (वय 24 रा. वडगाव,पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी वरून पोलिसांनी अत्रात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.शुभम रविंद्र वाघिरकर वय 23 असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ शुभम हा त्याच्या दुचाकीवरून जात होता. यावेळी त्याला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. यात शुभमच्या डोक्याला, हाताला जखम झाली. मात्र आरोपी तेथे न थांबता तेथून पसार झाला.यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.