Chakan : पोलीसांकडे तक्रार केली म्हणून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – मारहाण केल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी पोलीस ठाण्यात तक्रार का केली म्हणत चौघांनी तक्रारदाराला पुन्हा मारहाण केली आहे. हि घटना चाकण (Chakan) येथे शनिवारी (दि.2) रात्री घडली.

Chakan : रिक्षातील टेपचा आवाज मोठा ठेवला म्हणून रिक्षा चालकाला बेदम मारहाण, दोघांना अटक

याप्रकरणी प्रदिप भागवत पौळ (वय 20 रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी पराग बबन गायकवाड याला अटक केली आहे. तसेच त्याचे साथीदार रोहन घोगरे व दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मित्राला आरोपींनी मारहाण केली. याची तक्रार देण्यासाठी फिर्यादी व त्यांचे मित्र पोलीस ठाण्यात गेले. यावेळी तक्रार देऊन परतत असताना पराग व त्याच्या साथीदारांनी पोलीसांकडे तक्रर देतो का म्हणत पुन्हा मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने मारत जिवे मारण्याची धमकी दिली. चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.