Chakan : हॉटेलमध्ये घुसून तिघांकडून गोळीबार

एमपीसी न्यूज – चाकण येथे एका हॉटेलमध्ये घुसलेल्या तिघांनी गोळीबार (Chakan) केला. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रासे येथील मराठा हॉटेलमध्ये सोमवारी (दि. 18) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली.

हॉटेलचे मालक स्वप्निल उर्फ सोप्या संजय शिंदे हे यामध्ये जखमी झाले आहेत. राहुल पवार, अजय गायकवाड आणि अन्य एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे.

PCMC : पिंपरी-चिंचवड महापालिकेला 148 नवीन शिक्षकमिळणार

पोलीस उप आयुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल शिंदे यांचे चाकण परिसरामध्ये हॉटेल आहे. ते हॉटेलमध्ये असताना सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तिघेजण हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेलमध्ये दोन राउंड फायर केले. यामध्ये स्वप्निल शिंदे यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. स्वप्निल शिंदे आणि आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

घटनेची माहिती मिळतात चाकण पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी अजय गायकवाड याला अटक केली आहे. तर अन्य दोघांच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी राहुल पवार याचा लहान भाऊ रितेश पवार ह्याचा चार महिन्यापूर्वी खून झाला आहे. त्या खुनातील आरोपींना सोप्या शिंदे याने मदत केली असल्याच्या संशयावरून हा गोळीबार झाला असल्याचे म्हटले (Chakan) जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.