PCMC : पिंपरी-चिंचवड महापालिकेला 148 नवीन शिक्षक मिळणार

एमपीसी न्यूज – शासनाने जाहीर केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे ( PCMC) पिंपरी-चिंचवड महापालिकेला 148 नवीन शिक्षक मिळणार आहेत. महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने रिक्त पदांची यादी शासनाच्या पवित्र पोर्टलवर अपलोड केली होती. त्यानुसार या जागेवर पद भरती केली जाणार आहे. शिक्षक भरती झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षकांअभावी होणारी गैरसोय टळणार आहे.

राज्य शासनाने नुकतीच मोठी शिक्षक भरती करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षण भरती झाली नाही. शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. शिक्षक भरतीप्रक्रियेतून राज्यभरातील जिल्हा परिषद शाळा आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक भरती केली जाणार आहे.

Talegaon Dabhade : रोटरी आणि पॉस्कोतर्फे अंगणवाडी विकास प्रकल्पाचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सध्या शिक्षकांची संख्या अपुरी आहे. यामध्ये काही शिक्षकांना सर्वेसह इतर अतिरिक्त कामे दिली जात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिकवणुकीवर त्याचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारी आता संपणार आहेत. माध्यमिक विभागासाठी 148 नवीन कायमस्वरूपी शिक्षक भेटण्याचा मार्ग नवीन शिक्षक भरतीमुळे मोकळा झाला आहे.

याबाबत शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, पवित्र पोर्टलवर महापालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार, शहरात सध्या 148 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. त्याची यादी आपल्याला शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यांची कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर त्यांना आदेश दिले ( PCMC)  जातील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.