Talegaon Dabhade : रोटरी आणि पॉस्कोतर्फे अंगणवाडी विकास प्रकल्पाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून आणि पॉस्को यांच्या सीएसआर फंडामार्फत   (Talegaon Dabhade) अंगणवाडी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले. या उपक्रमांतर्गत साई अंगणवाडी, भाजे अंगणवाडी, लोखंडवाडी अंगणवाडी, नानोली अंगणवाडी यांचे बांधकाम आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

याप्रसंगी अध्यक्ष रो उध्दव चितळे, उपाध्यक्ष रो कमलेश कार्ले,सचिव रो श्रीशैल मेन्थे,खजिनदार रो प्रमोद दाभाडे,रो धनंजय मथुरे,रो आनंद असवले पाॅस्कोचे अमोल बुध्खळे,पृथ्वीराज देसाई, उपसरपंच नितीन पिंगळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Thergaon : आर्थिक विवंचनेतून आठ वर्षीय मुलीचा खून करून वडिलांची आत्‍महत्‍या

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून व “पॉस्को “यांच्या सीएसआर फंडा मार्फत अंगणवाडी विकास प्रकल्पअंतर्गत साई अंगणवाडी,भाजे अंगणवाडी, लोखंडवाडी अंगणवाडी,नाणोली अंगणवाडी यांचे बांधकाम व सुशोभीकरण करण्यात आले. प्राथमिक स्वरूपात मौजे साई येथील अंगणवाडीचे उद्धाटन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले.

आमदार शेळके यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले व पाॅस्को आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे करत (Talegaon Dabhade) असलेल्या कामाचे कौतुक केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.