Chakan : रिक्षातील टेपचा आवाज मोठा ठेवला म्हणून रिक्षा चालकाला बेदम मारहाण, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – रिक्षामधील टेपचा आवाज मोठा ठेवला म्हणून चार जणांनी रिक्षा चालकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना चाकण (Chakan) येथे शनिवारी (दि.2) घडली.

wadgaon : वडगांव घेनंद येथील श्री क्षेत्र महादेव मंदिर बेलीस भाविकांची गर्दी

याप्रकरणी चाकण पोलिसांनी अमोल विश्वनाथ लाटुकर (वय 27 रा. चाकण) व पराग बबन गायकवाड (वय 20 रा. चाकण) यांना अटक केली असून विवेक कुऱ्हाडे व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जिवन विक्रम जाधव (वय 21 रा.चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक असून ते रिक्षामध्ये प्रवासी घेऊन जात असाताना आरोपी दुचाकीवर थांबले होते.त्यांनी फिर्यादी जवळ येताच रिक्षातील टेपचा आवाज मोठा का केला म्हणून जाब विचारला. तचेच तु ओळखतो का आम्हाला म्हणत हाताने मारहाण करत फरशिचा तुकडा फिर्यादीच्या कापाळावर मारून जखमी केले. तसेच शीवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.