Chinchwad : चाकण, शिरगाव, वाकडमध्ये गुन्हे शाखांचे छापे

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळूस येथे सुरु ( Chinchwad ) असलेल्या दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. गुन्हे शाखेच्या युनिट पाचने शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या दारूभट्टीवर छापा मारला. तर अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे दीड किलो गांजा जप्त केला आहे.

काळूस येथील कारवाई प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीन मधील पोलीस अंमलदार राजकुमार हणमंते यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड (रा. काळूस, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehu : श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्यावतीने अखंड अन्नदान सेवा  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड याने काळूस गावात भाम नदीच्या काठावर गावठी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखा युनिट तीनने दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. आठ हजार लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी राठोड याने कच्चे रसायन वापरून भट्टी लावली होती. पोलिसांनी ( Chinchwad ) चार लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

पवना नदीच्या काठावर केलेल्या कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अंमलदार राजकुमार इघारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली होती. तिने तीन हजार लिटर दारू तयार करण्यासाठी लावलेले तीन लाख 500 रुपये किमतीचे रसायन पोलिसांनी नष्ट केले. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार मितेश यादव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिलांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबा नगर येथील एका टपरी समोर चार महिला गांजा विक्रीसाठी आल्या असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने कारवाई करून चारही महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक किलो 430 ग्रॅम गांजा आणि दोन मोबाईल फोन असा एकूण एक लाख एक हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत ( Chinchwad ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.