Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या

एमपीसी न्यूज – मुंबईतील दहिसर भागातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या (Abhishek Ghosalkar ) झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा   नावाच्या स्वयंघोषित नेत्यानं हा गोळीबार केला. मॉरिस नोरोन्हानं नंतर स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली. 

Pune : पुणे चक्राकार मार्गामुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा गुरुवारी संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. तब्बल 40 मिनिटे हे फेसबुक लाईव्ह सुरू होतं. फेसबुक लाईव्ह जेव्हा संपत आलं होतं, तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तुल काढलं, आणि पुन्हा खोलीत शिरून त्याने घोसाळकरांवर गोळीबार केला. गोळीबारामुळे अभिषेक घोसाळकर जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीनं करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही मिनिटांत त्यांच्यावर गोळ्या काढण्याची शस्त्रक्रिया सुरू झाली. मात्र अति रक्तस्त्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला.

मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार पैशाच्या व्यवहारातून केला असल्याचं समोर आलं आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला होता. पण आता तो मिटल्याने ते एकत्र आले होते. मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालत नंतर स्वतःवरही गोळी (Abhishek Ghosalkar ) झा़डून घेतली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.