Maharashtra : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा गोळ्या झाडून खून

एमपीसी न्यूज – सांगलीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व बाबा ग्रुपचे अध्यक्ष नालासाब मुल्ला (वय 50) याचा शनिवारी रात्री अज्ञातानी गोळ्या झाडून खून केला. शंभरफुटी रस्त्यावरील माने चौकात हा  प्रकार (Maharashtra) घडला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की नालसाब मुल्ला यांचे शंभर फुटी रस्त्यावर माने चौकापासून काही अंतरावर बाबा चौकात निवासस्थान, कार्यालय व बांधकाम साहित्य विक्रीचा डेपो आहे.
काल रात्री आठच्या सुमारास निवासस्थानाबाहेर असलेल्या वाचनालयाजवळ थांबला होता. तेव्हा अंधारात दुचाकीवरून दोघेजण तेथे आले.

क्षणात त्यांनी गोळीबार केला. मुल्ला याच्या छातीवर व पोटावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यांच्यासोबत आणखी दोघे असावेत असा संशय आहे.
गोळीबाराचा आवाज ऐकून मुल्ला याच्या घरातील व परिसरातील नागरिक धावले. तेव्हा मुल्ला गंभीर अवस्थेत होता. त्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांच्यासह विश्रामबाग पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक (Maharashtra) घटनास्थळी दाखल झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.