Mumbai : ट्रायडंट हॉटेलमध्ये आग लागली नव्हती; चालू होते मॉक ड्रिल

ट्रायडेंट हॉटेल प्रशासनाचा खुलासा

एमपीसी न्यूज -मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ट्रायडंटमध्ये आज सकाळी सातच्या सुमारास हॉटेलचा चिमणीमध्ये आग लागली होती. आगीची माहिती मिळताच ट्रायडेंट हॉटेलच्या आतमध्ये असलेला फायर सिस्टममधून हॉटेल कर्मचाऱ्यांनी आग विझवली आहे. मात्र या आगीसंदर्भात ट्रायडेंट हॉटेल प्रशासनाने माहिती देताना मॉक ड्रिल केल्याचं सांगितलं आहे.

मरीन ड्राईव्ह येथील ट्रायडंट हॉटेलच्या इमारतीच्या  वरच्या मजल्यावरून आज सकाळी 6:50 ते 7:10 च्या दरम्यान धुराचे लोळ पाहायला मिळाले.

 

Maharashtra : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा गोळ्या झाडून खून

मरीन ड्राईव्हवर सकाळी फिरायला जमलेल्या लोकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य टिपायला सुरुवात केली. मात्र काही वेळात हा धूर येणं थांबल्याने नक्की ट्रायडेंटमध्ये काय झालं होतं हे कारण अद्याप अस्पष्ट (Mumbai) आहे.मात्र ट्रायडेंट हॉटेल प्रशासनाने माहिती देताना मॉक ड्रिल केल्याचं सांगितलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.