Today’s Horoscope 18 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 18 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

18.06.2023.

शुभाशुभ विचार- वर्ज्य दिवस

आज विशेष- वर्ज्य दिवस.

राहू काळ – संध्याकाळी 4.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – मृग 18.06 पर्यंत नंतर आर्द्रा.

चंद्र राशी – मिथुन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- पिस्ता )

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील आज तुम्ही स्वतःचेच खरे कराल अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल आज प्रवास त्रासदायक होण्याची शक्यता आहे. घराबाहेर वाद टाळा.

वृषभ (शुभ रंग- भगवा )

धंद्यातील येणे वसूल होईल. आज विरोधकांशीही गोड बोलून तुम्ही आपला स्वार्थ साधून घ्याल. गृहिणी आज आकस्मिक येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आनंदाने करतील.

मिथुन ( शुभ रंग- राखाडी )

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हाऊस मौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतर्क रहा.

कर्क (शुभ रंग- तांबडा)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. नव्या ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. हीतशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस असल्याने तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील आज काही दुरावलेली नाती सुद्धा जवळ येतील सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

कन्या ( शुभ रंग- मोरपंखी)

नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट गरजेचे आहेत. मित्रांच्या नादी लागू नका.

तूळ ( शुभ रंग- निळा)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस. आज हातचे सोडून मृगजळा मागे जाऊ नका. कायद्याची चौकट मोडू नका. वरिश्ठांकडून शाब्बासकीची अपेक्षा अजिबात करू नका.

वृश्चिक (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. आज भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आज दिवस योग्य नाही. गाडी हळू चालवा.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. व्यावसायिक निर्णय घेताना भागीदारांना विश्वासात घ्या.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.

कुंभ (शुभ रंग – गुलाबी)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. आज काही बिकट प्रश्न सहजच सोडवू शकाल. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल. आज उत्साह पूर्ण दिवस.

मीन -(शुभ रंग – जांभळा )

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम राहाल. मातोश्रींकडून लाभ होईल. शेअर्स व्यवहारात मात्र अनुभवींचे सल्ले घ्यायला हवेत.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.