Alandi : अखेर आळंदी गावठाण विभागात पाणी पुरवठा सुरू; रात्रभर सुरू राहणार पाणी

एमपीसी न्यूज : भामा आसखेडवरून येणाऱ्या (Alandi) मुख्य जलवाहिनीचे लिकेज काढण्याचे काम पुणे मनपामार्फत सुरू असल्याने मागील 3 दिवस शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. जलवाहिनीच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून शहरास रात्री नऊ ते सकाळी साडेनऊ दरम्यान एकूण 13 टप्प्यात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

आज पूर्ण रात्र पाणी सोडण्यात येणार असून आळंदी खेड विभाग सकाळी 11 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. प्रत्येक भागात 1 तास पाणीपुरवठा याप्रमाणे 13 टप्प्यात क्षेत्रनिहाय पाणी देण्यात येणार आहे.

गावठाण विभाग पहिला टप्पा येथे पावणे नऊ वाजता पाणी पुरवठा (Alandi) सुरू झाला आहे.

1) गावठाण- पहिला टप्पा

2) संतोषी माता नगर, मरकळ रस्ता, सोळू रस्ता – 2रा, 3 रा, 4था टप्पा.

3). च-होली रस्ता – 5, 6, 7, 8 टप्प्यात

4) वडगाव व पद्मावती रस्ता – 9, 10, 11, 11, 13 टप्प्यात

माहिती पाणीपुरवठा विभाग प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण शहरात रात्रभर पाणी सोडण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आळंदी जलशुद्धीकरण केंद्रास सकाळी साडेदहा वाजल्यापासून उशिरा पर्यंत कमी दाबाने भामा आसखेड पाइपलाइन द्वारे पाणीपुरवठा होत असल्याने आळंदी शहरातील पाणीपुरवठा वितरणास उशीर झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.