Pimple Gurav : समर स्विमिंग कोचिंगचा प्रमाणपत्र वितरण सोहळा पॅरा ऑलिंपिक विजेते मुरलीकांत पेठकर यांच्या हस्ते संपन्न

एमपीसी न्यूज : महानगरपालिकेचे पाठबळ असले, की काय घडू शकते? याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथील काळुराम जगताप जलतरण तलाव. समर स्विमिंग कोचिंगचा प्रमाणपत्र वितरण सोहळा 16 जून 2023 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भारताचे पहिले पॅरा ऑलिंपिक विजेते, जागतिक विक्रमवीर व पद्मश्री पुरस्कार प्राप्त मुरलीकांत पेठकर यांनी भूषवले. या सोहळ्यात दीडशे विद्यार्थ्यांना पेठकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफीचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात बोलताना त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाचे कौतुक करताना म्हंटले, की महानगरपालिकेने जलतरण तलाव उपलब्ध केल्यामुळे समर स्विमिंग सारख्या प्रोफेशनल कोचेसला एक खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो आणि त्यातूनच भविष्यातील चांगले जलतरणपटू तयार होऊ शकतील.

क्रीडा विभागाच्या सहकार्यामुळे भविष्यात पिंपरी चिंचवडमधील एखादा जलतरणपटू नक्कीच ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात आणि भारताला मेडल मिळवून देऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठी प्रेरणा मिळाली आणि भविष्यात आपणही स्विमिंगमध्ये ऑलम्पिक विजेते होऊ शकतो असा विश्वास मिळाला. तसेच मुरलीकांत पेठकर यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी जी काही मदत लागेल ते ती करण्यास तयार असण्याचे आश्वासन दिले.

Nigdi : खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले दीड लाख; सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायासह एकाला अटक

याप्रसंगी या क्लासच्या संचालिका विद्या कदम यांनीही याचे संपूर्ण श्रेय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह तसेच जितेंद्र वाघ व क्रीडायुक्त (Pimple Gurav) मनोज लोणकर यांना दिले. सुरुवातीला तलाव मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच बरेच प्रयत्न करावे लागत होते आणि त्या प्रयत्नांना यश हे आयुक्त शेखर सिंह व वाघ यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी विशेष लक्ष देऊन दखल घेतली.

माझ्यासारख्या सामान्य प्रशिक्षिकेला योग्य तो न्याय दिला त्यामुळे आम्हाला खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आणि त्यातून अनेक विद्यार्थी घडवता आले याचा मला अतिशय आनंद होत आहे असे मत विद्या कदम यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.