Nigdi : खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले दीड लाख; सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायासह एकाला अटक

एमपीसी न्यूज : खंडणीचा गुन्हा दाखल  (Nigdi) न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई आणि एका इसमावर लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. हा सर्व प्रकार निगडी पोलीस स्टेशन येथे घडला. 

या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे, सागर तुकाराम शेळके (पो.शिपाई, दोघांची नेमणूक निगडी पो.स्टे. पिंपरी-चिंचवड पो.आयुक्तालय) आणि सुदेश शिवाजी नवले (वय 43 वर्ष, रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका 48 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी महिलेने एका ओळखीच्या व्यक्तीला काही पैसे कॅश आणि काही पैसे बँकेतून उसने दिले होते. परंतु, समोरील व्यक्तीने बँकेचे हप्ते न भरल्याने या महिलेने आपले पैसे परत मागितले. परंतु, सदर व्यक्तीने फिर्यादी महिलेविरुद्ध तक्रारीचा अर्ज दाखल केला.

हा अर्ज  सहायक पोलीस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे यांच्याकडे तपासणीसाठी आला असता अमोलने फिर्यादी महिलेकडे खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांची लाच मागितली. यासाठी  पोलिस शिपाई सागर शेळके आणि सुदेश नवले यांनी मदत केल्याने त्यांच्यावरही (Nigdi) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC: …तर महापालिका कर्मचाऱ्यांवर 25 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई

सदर कारवाई अमोल तांबे  (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र), शीतल जानवे (अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक माधुरी भोसले, पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर, पो.हवा. नवनाथ वाळके, पो.शि. सौरभ महाशब्दे, म.पो.शि. शिल्पा तुपे, आणि चालक पो.शि. पांडुरंग माळी, ला.प्र.वि. पुणे यांनी केली केली.

पोलिस प्रशासनाचे आवाहन – 

जर कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.