Pune : ‘व्ही आर एफ टेक्नोमीट 2023’ला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – द इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्सच्या (Pune) वतीने तिसऱ्या ‘व्ही आर एफ टेक्नोमिट- 2023’ या परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. ही परिषद वाकड येथे हॉटेल टीप टॉप येथे 16  जून रोजी सायंकाळी पार पडली. इमारती, रुग्णालये, मॉल, शाळा, महाविद्यालये, विमानतळे अशा ठिकाणी हिटिंग आणि कुलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या व्हेरिएबल रेफ्रिजरंट फ्लो (व्हीआरएफ सिस्टीम) या तंत्रज्ञानाच्या वापराला भारतात 41 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या परिषदेच्या आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेमध्ये 264 प्रतिनिधी सहभागी झाले. भारतीय उपखंडाच्या दृष्टीने व्ही आर एफ सिस्टीमचे महत्त्व, विकसक आणि आरेखकांच्या दृष्टीने असलेले महत्त्व, याची चर्चा या परिषदेमध्ये करण्यात आली. व्ही आर एफ सिस्टीम बद्दल जनजागृती घडवणे हा या परिषदेचा उद्देश होता.

पुण्यात या तंत्रज्ञानाचा वापर जास्त केला जातो. या तंत्रज्ञानाच्या पर्यावरणपूरक आणि शहर विकासाभिमुख पैलूंची चर्चा परिषदेत करण्यात आली.

Warje : धक्कादायक! वारजेमध्ये भर दिवसा तरुणावर गोळीबार

प्रमुख अतिथी आर.एस. कुलकर्णी (Pune) तसेच प्रशांत देसाई, गणेश भोसले यांनी मार्गदर्शन केले. अनुज गुप्ता, सिम्पल जैन यांनी परिषदेच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन देखील केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

इशरे पुणे शाखेचे अध्यक्ष नंदकिशोर कोतकर, सचिव सुभाष खनाडे यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. अमित गुळवडे, चेतन ठाकूर, वीरेंद्र बोराडे, सुभाष खनाडे यांनी परिषदेचे संयोजन केले. मित्सुबिशी इलेक्ट्रिक, मेसर्स टेस्टो, मेसर्स हरी ओम, मेसर्स आरमा सेल यांच्या सहकार्याने ही परिषद यशस्वीपणे पार पडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.