Warje : धक्कादायक! वारजेमध्ये भर दिवसा तरुणावर गोळीबार

एमपीसी न्यूज : पुण्यात गुन्हेगारीचे विश्व वाढतच चालले आहे. सामाजिक क्षेत्रात खुलेआम (Warje) हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. आज वारजे माळवाडी परिसरात एका तरुणावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

सूरज तात्याबा लंगर (वय 21) असे पीडित तरुणाचे नाव असून तो वारजे या भागातच राहतो. वैमनस्यातून ही घटना घडल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Pune News – भारतीय विद्या भवनमध्ये रंगला ‘खमाज रंग’

दुपारी चारच्या सुमारास सुरज जयभवानी चौकातील पाण्याच्या टाकीजवळ असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्याच्याजवळ येऊन पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.  हल्ल्यामागील नेमका हेतू शोधण्यासाठी आणि त्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.