Pune News – भारतीय विद्या भवनमध्ये रंगला ‘खमाज रंग’

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या (Pune News) सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 167 व्या ‘खमाज रंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 17 जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’च्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. खमाज थाटातील खमाज, तिलक कामोद, व देस या तीन रागांवर आधारित बंदिश, नाट्य पदे व तराणा सुचेता अवचट आणि सहकाऱ्यांनी सादर केला. हा कार्यक्रम विनामूल्य होता. 

संगीत विद्याहरण नाटकातील ‘मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला’ हे नाटयपद सुचेता अवचट यांनी सादर केले. ‘या नव नवल नयनोत्सवा’ हे नाटय पद व्हायोलिनवर सविता सुपनेकर यांनी सादर केले. तसेच सविता सुपनेकर, प्रभंजन पाठक यांनी  शास्त्रीय संगीतावर आधारित मेडले व जुनी हिंदी मराठी गाणी बंदीश व्हायोलिनवर सादर केली.

तिलक कामोद या रागाने समारोप झाला. तिलक कामोद रागातील बंदीश प्रभंजन पाठक, सविता सुपनेकर यांनी व्हायोलिनवर सादर केली. ‘गगन सदन तेजोमय’सह या सर्व सादरीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला.

Kothrud : ‘नृत्यात्मन’ कथक नृत्य प्रस्तुतीला भरभरून प्रतिसाद

सविता सुपनेकर, प्रभंजन पाठक (व्हायोलिन),अनुराग अलुरकर (तबला), चंद्रकांत चिट्टे (सिंथेसायझर), उमाशंकर बेलवाले(हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले व उपस्थित कलाकारांचा सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.