Warje : वारजेत शब्दब्रम्ह व्याख्यानमाला संपन्न

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका (Warje) मराठी भाषा संवर्धन समिती व साहित्यिक कट्टा वारजे वतीने शब्दब्रम्ह व्याख्यान मालेचे दि 12 ते 14 मार्च दरम्यान वारजे येथील नाना नानी उद्यानानात आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेसाठी प्रदीप उर्फ बाबा धुमाळ व दीपाली धुमाळ यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

हे व्याख्यान मालेचे पांचवे वर्ष असून उद्घाटनाचे पहिले पुष्प सामाजिक कार्यकर्ते पराग ठाकुर यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांची आर्थिक सामाजिक व राजकीय नीती या विषयावर गुंफले. द्वितीय पुष्प लेखिका सुनिताराजे पवार यांनी काल आज आणि उद्या या संदर्भात विचार व्यक्त केले. समारोपाचे शेवटचे पुष्प डॉ. आशुतोष जावडेकर यांनी विनोदाच्या गांवा या विषयावर गुंफले.

व्याख्याना नंतर साहित्य कट्टाच्या वतीने प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ, यांनी मायमराठी पुरस्काराच्या विषयी भूमिका विशद केली. वारजे परिसरातील मराठी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व नवोदित लेखकास या निमित्ताने सन्मानीत करण्यात येते. या वर्षी प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे व लेखक समीक्षक शैलेश त्रिभुवन यांना माय मराठी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी आपले विचार व्यक्त करताना वारजे परीसरातील समृध्द साहित्यिक व सांस्कृतिक कार्याचे विशेष योगदानाबद्दल कौतुक केले.

Mahavitaran : वीज थकबाकी मोहिमेत वीज तोडणीच्या 15 दिवस आधी नोटीस द्यावी, सजग नागरिक मंचाची महावितरणकडे मागणी

व्याख्यानमालेस परिसरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात (Warje) प्रतिसाद मिळाला. अतुल घटवाई यांनी सुत्रसंचालन केले. समारोप प्रसंगी उदय कुलकर्णी यांनी आभार मानले व वंदना रोपलेकर व ऋतू मेहरा यांनी पसायदान सादर केले. व्याख्यान माला यशस्वी होण्यासाठी वि.दा.पिंगळे, डी के जोशी, नंदकिशोर बोधाई, सुरेश जाधव, मानसी नलावडे, महादेव गायकवाड, शरद जतकर, जयंत मोहिते, गोपाळ कुलकर्णी, महेश कुलकर्णी, साधना कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.