Alandi : माऊली मंदिरातील अजान वृक्षाच्या येथे पक्षांकरीता दाणा-पाण्याची सोय

एमपीसी न्यूज : आळंदी येथील माऊली मंदिरामध्ये अजान (Alandi) वृक्षांच्या येथे विविध प्रकारच्या पक्षांकरीता दाणा पाण्याची सोय होत आहे. आळंदीतील शेतकरी तसेच पंचक्रोशीतील शेतकरी आपले पहिले धान्य(ज्वारीची कणसे) पक्षांसाठी तिथे ठेवत आहे. पक्षांच्या अन्नाची सोय व्हावी याकरीता सद्यस्थितीत येथील वृक्षांवर विविध ठिकाणी पंचक्रोशीतील काही शेतकऱ्यांकडून ज्वारीचे कणसे ठेवण्यात आली आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांचे शेतीतील पहिले धान्य देवाला ही अर्पण होत असून पक्षांसाठी ते उपयोगी पडत आहे.

तसेच संस्थान सुध्दा यात सहभागी होऊन पक्षांच्या दाण्या पाण्याची सुविधा अजान वृक्षांच्या येथे विविध ठिकाणी त्यांनी केली आहे.
बहुत करून चिमण्या तेथील दाणे पाणी पिताना दिसून येतात.

चिमण्यांचा चिवचिवाटही मोठ्या प्रमाणात तिथे ऐकू येतो. या अन्न पाण्याच्या सुविधे मुळे अनेक चिमण्या मंदिर परिसरात दिसतात. यामुळे त्या पक्षांचे संवर्धन होत आहे.

Warje : वारजेत शब्दब्रम्ह व्याख्यानमाला संपन्न

तसेच आळंदीतील पक्षीप्रेमी सुद्धा आप आपल्या परिसरात (चिमण्या व इतर पक्षांसाठी ) पक्षांच्या दाणा पाण्याची सोय करताना दिसून (Alandi) येतात.

खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे.

चिमणी संवर्धनासाठी पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.व पक्षांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.