Mahavitaran : वीज थकबाकी मोहिमेत वीज तोडणीच्या 15 दिवस आधी नोटीस द्यावी, सजग नागरिक मंचाची महावितरणकडे मागणी

एमपीसी न्यूज – आर्थिक वर्ष संपत (Mahavitaran) आल्यामुळे महावितरणचे सर्व कर्मचारी थकबाकी वसुली मोहीम राबवत आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. मात्र वीज कायदा 2005’मधील कलम 56 प्रमाणे कोणाचाही वीजजोड 15 दिवसांची नोटीस दिल्याशिवाय तोडता येत नाही. त्यामुळे महावितरणने सरसकट वीजजोड तोडण्याची कारवाई करताना, या नियमाचे पालन करावे,’ अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी त्यांना बिल भरण्याची संधी मिळावी, म्हणून वीज कायदा 2005 मध्ये 15 दिवसांची नोटीस दिल्याशिवाय वीजजोड तोडता येत नाही, असे स्पष्ट म्हटले आहे.

Pune : हिंदू जनजागृती समितीतर्फे होळी निमित्त संस्कृती रक्षण आणि पर्यावरण रक्षण मोहीम

ही (Mahavitaran) तरतूद धाब्यावर बसवून परीक्षांच्या दिवसांत ग्राहकांना त्रास दिला जात आहे. यासंदर्भात अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करायला विरोध नाही. परंतु हे करताना कायद्याचे पालन करणेही आवश्यक आहे, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.