Mahavitaran : रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा, लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

एमपीसी न्यूज – घराच्या छपरावर रूफ टॉप सोलर सिस्टिम (Mahavitaran) बसवून 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले.

मुख्य अभियंता पवार म्हणाले की, वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे. रूफ टॉप सोलर सिस्टिमसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी 78 हजार रुपये अनुदान थेट मिळते. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक 78 हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे.

महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल अॅपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केलेली असून वीज ग्राहकांनी योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे.

Pimpri : 11 वर्षीय मुलाने दिले 16 वर्षीय मुलाला हृदय; 3 तासांत आव्हानात्मक शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केली यशस्वी

एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिम मधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात (Mahavitaran) दरमहा सुमारे 120 युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते.

घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.