Chinchwad : प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘ज्ञानविस्तार कार्यक्रम’ संपन्न

एमपीसी न्यूज – चिंचवड (Chinchwad ) येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संस्थेचे सचिव डॉ.दिपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय ‘ज्ञानविस्तार कार्यक्रम’ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभाग व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पहिल्या दिवशी स्पर्धा परीक्षा या विषयावर प्रा.दिलीप मोराळे व रविंद्र वायकर यांनी तर, दुसर्‍या दिवसी ‘समान नागरी कायदा’ या विषयावर प्रा.वैशाली देशपांडे व अ‍ॅड. हर्षद कराड यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

Mahavitaran : रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा, लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

दोन (Chinchwad) दिवसीय कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.पोर्णिमा कदम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन ‘समन्वयक’ प्रा.सुशील भोंग यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहा वीरखेडे, अश्विनी वाघमारे, मनिषा मोटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.