Loksabha election : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतुकीत मोठे बदल

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची ‘महाविजय संकल्प सभा’ वानवडी येथील रेस कोर्स मैदान येथे उद्या दि.(29 एप्रिल) रोजी सायंकाळी 5.30 वाजता  होणार असून पुणे पोलिसांकडून शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत तरी नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन(Loksabha election) पुणे पोलिसांनी केले आहे.

 

पुणे जिल्हयातील चार(पुणे, शिरूर,मावळ आणि बारामती) लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची रेस कोर्स मैदान येथे उद्या महाविजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी  महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने पुणे पोलिसांकडून शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले असून पुण्यातील नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे सांगितले आहे. तसेच, रेस कोर्स मैदानाच्या परिसरात उद्या दुपारी तीननंतर वाहतूक करू नये, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी माहिती(Loksabha election) दिली.

 

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या ‘महाविजय संकल्प’ सभेचे आयोजन

 

उद्या दुपारी चार ते रात्री नऊ या कालावधीत खालील मार्गांवर वाहतुकीत बदल केले जाणार आहेत .

रेसकोर्स परिसरामधील पाणी टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे.

टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक, रस्ता बंद असेल.

सोलापूर रोडवरील अर्जुन रोड जं. ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता बंद असेल.

बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद असेल. यासाठी पर्यायी मार्ग – मम्मादेवी जंक्शन येथून व बेऊर रोड जंक्शन येथून जाता येईल.

त्याचप्रमाणे खालील रस्ते आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपामध्ये बंद करण्यात येणार आहेत.

गोळीबार मैदान ते भैरोबा नाला (सोलापूर रोड)
पर्यायी मार्ग – गोळीबार मैदान चौक – लुल्लानगर मार्गे जाता येईल.

भैरोबा नाला ते गोळीबार मैदान चौक (सोलापूर रोड)
पर्यायी मार्ग – भैरोबा नाला ते लुल्लानगर मार्गे जाता येईल.

मोर ओढा ते भैरोबा नाला (एंम्प्रेसगार्डन रोड)
पर्यायी मार्ग – मोर ओढा -घोरपडी रेल्वेगेट – बी.टी. कवडे रोडने अथवा वॉर मेमोरीयल ते घोरपडी ते डोबारवाडी मार्गे बी.टी. कवडे रोडने जाता येईल.

भैरोबा नाला ते मोर ओढा
पर्यायी मार्ग – बी.टी. कवडे जंक्शन ते बी.टी. कवडे रोडने उड्डाणपुलावरुन जाता येईल.

मोर ओढा ते मम्मादेवी (काहुन रोड जंक्शन बेऊर रोड मार्गे)
पर्यायी मार्ग – मोर ओढा – सदन कमांड – कॉन्सिल हॉल – ब्लु नाईल मार्गे जाता येईल.

गोळीबार मैदान, मम्मादेवी चौक, भैरोबा नाला चौक, आंबेडकर पुतळा चौक कॅम्प, कोरेगाव पार्क जंक्शन, ताडीगुत्ता चौक, नोबल हॉस्पीटल दरम्यान वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यासाठी वाहनचालकांनी सोमवारी दुपारी दोन ते रात्री दहा या कालावधीत बाहेरील रस्ते उदा. नगर रोडने जाण्यासाठी पोल्ट्रीफार्म चौक ते संगमवाडी मार्गे तसेच सोलापुर रोड ते जेधे चौक जाण्यासाठी लुल्लानगर, गंगाधाम चौक, सातारा रोड याचा वापर करावा. त्याचप्रमाणे मंतरवाडी, खडीमशीन चौक कात्रज़ रोड या बाह्यवळण रस्त्याचा तसेच खराडी बायपास, मुंढवा, नोबल हॉस्पीटल रोडचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.