Pune : कोंढव्यातील कत्तलखान्याचे खासगीकरण रद्द करण्यासाठी पुणे महापालिकेसमोर विविध संस्था, संघटनांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – कोंढवा येथील कत्तलखान्याचे खासगीकरण रद्द करण्याच्या  (Pune) मागणीसाठी विविध हिंदू, अहिंसा व प्राणीप्रेमी संस्था, संघटनांच्या वतीने पुणे महानगरपालिकेसमोर सोमवारी (दि.11) आंदोलन करण्यात आले.

डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासह जैन साधू परमपूज्य विराग सागर जी महाराज, प्रीतीसुधाजी महाराज, सकल हिंदू समाज संस्थेचे मिलिंद एकबोटे, माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले, सकल जैन संघाचे डॉ. अशोक कुमार पगारिया, समस्त महाजनचे महाराष्ट्र समन्वयक रमेश ओसवाल, हिंदू रक्षक उज्ज्वला गौड यांच्यासह जैन, हिंदू समाजातील शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Chinchwad : प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘ज्ञानविस्तार कार्यक्रम’ संपन्न

इतर अनेक हिंदू रक्षक व गोरक्षक संस्थांच्या प्रतिनिधीनी आपल्या भावना व्यक्त करत पुणे महानगर पालिकेने कत्तलखान्याच्या खासगीकरणाचा निर्णय तातडीने रद्द (Pune) करण्याची मागणी केली. तसेच हा प्रस्ताव मागे घेऊन कत्तलखान्याचे खासगीकरण रद्द केले नाही, तर भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.