Kharadi : जमीन खरेदीसाठी निघालेल्या दाम्पत्याकडील 8 लाखांची रोकड चोरांनी लुबाडली

एमपीसी न्यूज – जमीन खरेदीसाठी (Kharadi) निघालेल्या दाम्पत्याकडील 8 लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खराडी परिसरात सोमवारी (दि.11) घडली.

याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात सुरेश नामदेव खंकाळ (वय 45, रा. जयसिंग हाऊसजवळ, देहूरोड) फिर्याद दिली आहे. यावरून दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका रुग्णालयात कामाला आहेत. खंकाळ दाम्पत्य जमीन खरेदी करणार होते. व्यवहारासाठी त्यांनी बँकेतून 8 लाख 16 हजार रुपये काढले. पैसे पिशवीत ठेवून खंकाळ दाम्पत्य सोमवारी दुपारी दुचाकीवरुन नगर रस्त्यावरील खराडी बायपास चौकातून केशवनगर कडे निघाले होते. चोरटे त्यांच्या मागावर होते.

Pune : कोंढव्यातील कत्तलखान्याचे खासगीकरण रद्द करण्यासाठी पुणे महापालिकेसमोर विविध संस्था, संघटनांचे आंदोलन

आर. के. बिअर शॉप समोर दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी खंकाळ यांच्याकडील रोकड ठेवलेली पिशवी चोरून नेली. चोरटे मुंढव्याकडे पसार झाले. पिशवीत 8 लाख 16 हजारांची रोकड, आधारकार्ड, धनादेश पुस्तिका (Kharadi) असा मुद्देमाल होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त संजय पाटील, पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, उपनिरीक्षक तानाजी शेगर तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.