Pune Railway : अमृत भारत स्टेशन योजना; पुणे विभागातील 10 रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास

एमपीसी न्यूज – अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (Pune Railway) पुणे विभागातील दहा रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. तर मध्य रेल्वेच्या एकूण 36 रेल्वे स्थानकांवर विविध अपग्रेडेशनची कामे केली जाणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत 56 स्थानके जागतिक दर्जाच्या स्टेशनच्या रूपात विकसित करण्यात येणार आहेत. या 56 स्थानकांपैकी मध्य रेल्वेच्या 36 पैकी पुणे विभागातील 10 स्थानके देहूरोड, चिंचवड, हडपसर, उरुळी, केडगाव, बारामती, लोनंद, वाठार, कराड आणि सांगली यांचा मोठ्या प्रमाणात कायापालट आणि पुनर्विकास होणार आहे. या कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान या कामांची पायाभरणी 26 फेब्रुवारी रोजी करणार आहेत.

भारतीय रेल्वेने अमृत भारत स्टेशन योजना (एबीएसएस) अंतर्गत अद्यायवत आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील 1309 स्थानके निवडली आहेत. या वर्षीच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला 15 हजार 554 कोटी रूपयांचा रेकॉर्ड निधी मिळाला आहे.

पंतप्रधान मोदी 1500 रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) आणि रोड अंडर ब्रिजेसचे (आरयूबी) उद्घाटन करतील. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 554 स्थानकांच्या कायापालटासाठी पायाभरणी होणार आहे.

Pune: 24 तारखेला महाविकास आघाडीचा मेळावा ; शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष 

अमृत भारत स्टेशन योजना ही पंतप्रधान मोदी यांनी आणलेला एक दूरदर्शी उपक्रम आहे. ज्या अंतर्गत देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन केले जाणार असून आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनल्समध्ये रूपांतरित केले जाणार (Pune Railway) आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅव्हल हबचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. अमृत भारत स्थानक योजनांमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा सातत्यपूर्ण विकास होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.