Dehuroad : भरधाव बसची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव बसने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकी (Dehuroad)चालक गंभीर जखमी झाला. तर दुचाकीवरील सह प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी सात वाजता देहूगाव कमानीसमोर, देहूरोड येथे घडली.

राजू सीताराम नवघरे (वय 50, रा. येलवाडी, देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस (Dehuroad)ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस (एमएच 14/एचजी 4133) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर त्यांच्या पालकांवरसुद्धा होणार कारवाई – अमितेश कुमार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवघरे हे एका महिलेला माळवाडी येथून देहूरोड येथे दुचाकीवरून घेऊन जात होते.

 

ते जुना पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे असलेल्या देहूगाव कमानीजवळ आले असता आरोपी बस चालकाने त्याच्या ताब्यातील बस हयगयीने चालवून नवघरे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये नवघरे गंभीर जखमी झाले तर त्यांच्या दुचाकीवरील 30 वर्षीय सह प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.