Pune : अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर त्यांच्या पालकांवरसुद्धा होणार कारवाई – अमितेश कुमार

एमपीसी न्यूज – पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा ( Pune) बसावा यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली . यामध्ये पुणे पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना गुन्हेगारी  टोळ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत .

Bhosari : बस थांब्यावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी वाहनांच्या तोडफोडीच्या प्रकरणात सुद्धा मोठी वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त यांनी याबाबत आता कठोर पावले उचलली आहेत.

“अल्पवयीन मुलांकडून जर कुठला गुन्हा घडत असेल तर त्याला प्रतिबंध करण्याचे काम त्यांच्या पालकांचे सुद्धा आहे . त्यामुळे जर अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर आता त्या मुलांच्या पालकांवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे,” अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे. तसचं पुण्यात कोयत्याने हल्ले रोखण्यासाठी शहरात कुठे कुठे कोयते विकल्या जातात यावर लक्ष देण्यात येणार असल्याचेही त्यांनी ( Pune) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.