Chakan : भरधाव दुचाकीची तीन महिलांना धडक; एकीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक महामार्गावर सुंबरेनगर येथे भरधाव दुचाकीने (Chakan )पाठीमागून तीन महिलांना धडक दिली. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 1 ) रात्री साडे दहा वाजता घडला.

सखुबाई नामदेव धामणे (वय 65, रा. संभाजीनगर, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या(Chakan )महिलेचे नाव आहे. कल्पना सुनील पिंगळे (वय 28), सान्वी पिंगळे या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

याप्रकरणी अक्षय ब्रह्मस्वरूप चतुर्वेदी (रा. रोहकल फाटा, ता. खेड, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश) याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

 

Pune : अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर त्यांच्या पालकांवरसुद्धा होणार कारवाई – अमितेश कुमार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखुबाई, कल्पना आणि सान्वी या तिघी पुणे-नाशिक महामार्गावरून सुंबरेनगर येथून पायी चालत जात होत्या. त्यावेळी आरोपी अक्षय हा त्याच्या दुचाकी (युपी 50/जीके 6815) वरून भरधाव आला. त्याने तिघींना पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये तिघी गंभीर जखमी झाल्या. त्यातच सखुबाई यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.