Wakad : सासरच्या लोकांनी जावयाला मागितली 25 लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज – जबरदस्तीने लॅबमध्ये घुसून सासरच्या 12 जणांनी मिळून (Wakad )जावयाला मारहाण करत 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच जावयास गाडीत डांबून पोलीस ठाण्यात आणले. ही घटना 18 ऑक्टोबर 2023 रोजी घडली असून याप्रकरणी 16 मार्च 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल शंकर घोणसे (वय 60), सुनील शंकर घोणसे (वय 58), (Wakad )माधव पाटील (वय 55), भास्कर पाटील (वय 45), काका हिवराळे (वय 47), गोट्या उर्फ अश्विन पाटील (वय 24), एक महिला (सर्व रा. निवळी, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि इतर पाच अनोळखी लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Mahalunge : पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक
याप्रकरणी महादेव ज्ञानोबा जाधव (वय 35, रा. थेरगाव, पुणे. मूळ रा. उदगीर, ता. लातूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी मेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून फिर्यादी जाधव यांच्या लॅबमध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडे 25 लाख रुपयांची मागणी केली. त्यांना बळजबरीने एका कारमध्ये डांबून मारहाण करत त्यांना वाकड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी जाधव यांच्यावर त्यांच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा नोंदवला आहे. त्या प्रकरणात त्यांच्या सासरचे लोक सर्व आरोपी त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यासाठी गेले. ते पोलीस ठाण्यात येत नसल्याने त्यांना बळजबरीने पोलीस ठाण्यात आणले गेले होते. जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने हा खंडणी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.