Mahalunge : पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी (Mahalunge) महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. 16) सायंकाळी पाच वाजता महाळुंगे ते आंबेठाण रस्त्यावर द्वारका सीटी समोर करण्यात आली.

सोनू नकिक अहमद (वय 31, रा. महाळुंगे गाव, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल माटे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिल्या आहेत. पोलीस अंमलदार अमोल माटे यांना माहिती मिळाली की, महाळुंगे ते आंबेठाण रस्त्यावर द्वारका सीटी समोर एकजण संशयितरीत्या थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन अहमद याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली. महाळुंगे पोलीस तपास करीत (Mahalunge) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.