Talegaon : खोटे झुंबर खरे भासवून तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोनेरी रंगाचे झुंबर सोन्याचे आहे, असे खोटे भासवून (Talegaon)एका महिलेकडून तीन लाखांचे दागिने घेत तिची फसवणूक केली. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी चार वाजता सोमाटणे फाटा येथे घडली.

याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (Talegaon)अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Wakad : सासरच्या लोकांनी जावयाला मागितली 25 लाखांची खंडणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांची तोंडओळख आहे. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना सोमाटणे फाटा येथे बोलावून घेतले. त्याच्याकडे लहान मन्याचे सोनेरी रंगाचे झुंबर सोन्याचे आहे, असे भासवून ते झुंबर महिला देणार असल्याचा त्याने बहाणा केला.

 

त्यासाठी आरोपीने महिलेकडून सहा तोळे वजनाचे दोन लाखांचे सोनाचे गंठण आणि एक लाख रुपये किमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र असे तीन लाखांचे दागिने घेतले. खरे दागिने घेऊन आरोपी निघून गेला. त्यानंतर त्याने दिलेले झुंबर खोटे असल्याचे उघडकीस आले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.