Hinjawadi : घरफोडी करून 95 हजारांचे साहित्य चोरीला ; एकास अटक

एमपीसी न्यूज – घरफोडी करून चोरट्याने 95 हजार 500 रुपयांचे साहित्य (Hinjawadi)चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी साडेपाच वाजता भरणेवस्ती, माणगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

पाकी उर्फ पक्या मन्सूर शेख (वय 40, रा. माण, ता. मुळशी) असे अटक केलेल्या (Hinjawadi)आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : सासरच्या लोकांनी जावयाला मागितली 25 लाखांची खंडणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा कडी, कोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून 90 हजारांचे 20 ग्रॅम वजनाचे दागिने आणि 5 हजार 500 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण 95 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.