Chikhali : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने एकास मारहाण

एमपीसी न्यूज – संस्थेच्या नावाने शिव्या देत असलेल्या व्यक्तीला जाब विचारला (Chikhali)असता दोघांनी मिळून जाब विचारणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना 9 मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता रुपीनगर तळवडे येथे घडली.

राजू मोला शेख (वय 33, रा. ओटास्कीम, निगडी), इमाम मौला  बिजापुरे (वय 32, रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी इम्रान आयुब खान (वय 36, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dehuroad : भरधाव बसची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगर मधील एका हॉटेल मध्ये फिर्यादी खान चहा पीत (Chikhali)असताना आरोपी दोघेजण तिथे आले. खान हे गुलटेकडी पुणे येथील गणीबाबा दर्गा संस्थेच्या विश्वस्त पदावर कार्यरत आहेत.

आरोपींनी त्या संस्थेला शिवीगाळ केली. त्याचा खान यांनी जाब विचारला असता आरोपींनी खान यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.