Dehuroad : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल बाळगल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका तरुणाला (Dehuroad )अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 30) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास श्रीकृष्ण मंदिराजवळ देहूरोड येथे करण्यात आली.
कुणाल सुभाषचंद्र वाल्मिकी (वय 29, रा. श्रीकृष्ण मंदिराजवळ, देहूरोड) असे (Dehuroad )अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार स्वप्निल साबळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमबी कॅम्प देहूरोड येथे श्रीकृष्ण मंदिराजवळ राहणाऱ्या कुणाल वाल्मिकी याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कुणाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे एक पिस्टल आणि 500 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.