Pune: महावितरणच्या पुण्यातील आणखी दोन उपकेंद्रांना ‘आयएसओ’चे मानांकन

एमपीसी न्यूज – महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत वानवडी येथील(Pune) रेसकोर्स आणि धनकवडी येथील साईमिस्टिक या आणखी दोन उपकेंद्रांनी नुकतेच ‘आयएसओ 9001:2015’चे मानांकन मिळविले आहे. मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत या दोन्ही उपकेंद्राना ‘आयएसओ’चे परीक्षक नंदकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत संबंधित उपकेंद्रांना ‘आयएसओ’ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

उल्लेखनीय म्हणजे, वानवडी येथील महावितरणच्या रेसकोर्स उपकेंद्राने राज्यातील(Pune) सर्व वीज वितरण कंपन्यांमध्ये प्रथमच गुणवत्ता, पर्यावरण व सुरक्षा या तिनही वर्गवारीत स्वतंत्र आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे.

 

महावितरणचे उपकेंद्र व स्विचिंग स्टेशन्स ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणासोबतच त्याची योग्य निगा, दर्जा व व गुणवत्ता अबाधित ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

 

त्यादृष्टीने उपकेंद्रांची गुणवत्ता, कामकाजाचा दर्जा, सर्व प्रकारची सुरक्षा उपाययोजना व उपकरणांची उपलब्धता, पर्यावरण दस्ताऐवजीकरण, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण आदी कामे करण्यात येत आहे. यामध्ये रास्तापेठ विभागातील रेसकोर्स 22/22/11 केव्ही उपकेंद्र (सेंट मेरी उपविभाग) आणि पद्मावती विभागातील साई मिस्टिक22/22 केव्ही स्विचिंग स्टेशन (धनकवडी उपविभाग) आयएसओ 9001:2015च्या मानांकनासाठी पात्र ठरले आहे.

धनकवडी व वानवडी येथे झालेल्या स्वतंत्र कार्यक्रमात आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी वानवडी येथे कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, बॅटमिंटन कोर्टचे उद्घाटन तसेच धनकवडी येथे डॉ. दत्ता कोहिनकर यांचा तणावमुक्तीसाठी व्याख्यान झाले. तसेच दोन्ही ठिकाणी उपकार्यकारी अभियंता संतोष पाटणी यांनी वीजसुरक्षेबाबत प्रबोधन केले.

Pune: पुणे महापालिकेला श्री तांबडी जोगेश्वरीच्या ‘ग्रामदेवता पुरस्कार’ 

‘आयएसओ’चे मानांकन मिळविण्यासाठी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, संजीव नेहेते (स्थापत्य) कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे (रास्तापेठ), रवींद्र आव्हाड (पद्मावती), भागवत थेटे (प्रशासन), अतिरिक्त कार्यकारी अभियंता डॉ. संजय घोडके, राजेंद्र भुजबळ, देविदास तिडके, नीलेश रोहणकर, सहायक अभियंता श्री. स्वप्निल जाधव, श्री. प्रभाकर पवार तसेच बाबासाहेब शिंदे, पुंडलिक काशिद, सिद्धार्थ एकबोटे, प्रतिक शिंदे, अक्षय वाघमोडे यांनी कामगिरी केली.

 

मुख्य अभियंता, पुणे परिमंडल राजेंद्र पवार म्हणाले ‘महावितरणचे उपकेंद्र सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. सर्वच उपकेंद्राचा दर्जा व कार्यक्षमतेत सातत्य राखण्यासाठी नेहमी उपाययोजना सुरु असतात. त्यास आणखी वेग देण्यात आला आहे. यात पाच उपकेंद्रांना आयएसओ ९००१:२०१५ चे मानांकन मिळाले आहे. त्यासाठी संबंधित सर्वांचे कौतुक आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.