Pune: पुणे महापालिकेला श्री तांबडी जोगेश्वरीच्या ‘ग्रामदेवता पुरस्कार’ 

एमपीसी न्यूज – पुण्यनगरीची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने (Pune)श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने देण्यात येणारा ‘ग्रामदेवता पुरस्कार पुणे महापालिकेला प्रदान करण्यात आला.
महापालिका प्रशासक-आयुक्त विक्रम कुमार यांनी हा पुरस्कार स्विकारला. तसेच ‘सेवाव्रत गौरव’ म्हणून ‘स्व’ रुपवर्धिनी आणि राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्टला गौरवण्यात आले.
या पुरस्काराचे वितरण माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र धंगेकर (Pune)आणि उपस्थित मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. मंडळाने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात सुरु केलेली पुरस्काराची ही परंपरा सलग 5वर्षे सुरु आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.
समाज प्रबोधक आणि समाज बदलाची कार्ये केलेल्या संस्थांना किंवा संस्थांना या ‘ग्रामदेवता’ पुरस्काराने गौरवण्यात येतं. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार मिळवण्याचा बहुमान पुणे महानगरपालिकेला मिळाला.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, युवा उद्योजक पुनीत बालन, प्रवीण परदेशी, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, यांच्यासोबतच पुण्यनगरीतील अष्टविनायक मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.