Thergaon : महापालिका उभारणार 60 खाटांचे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय

रुग्णांना अल्प दरात उपलब्ध होणार अत्याधुनिक आरोग्य सेवा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत कर्करोगावरील विशेष (Thergaon )उपचार पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून थेरगाव रुग्णालयात 60 खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या अत्याधुनिक रुग्णालयाच्या बांधकामाची निविदा 12 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार आरोग्यसेवेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भविष्यात 100 खाटांपर्यंत कर्करोग रुग्णालयाचा विस्तार करण्यात येणार आहे. 34,848 चौरस फुटामध्ये उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयाचे उद्दिष्ट प्रशस्त पार्किंग तसेच अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह रुग्णांच्या सोयी वाढवणे, सुलभ पद्धतीने रुग्णांना आरोग्यसेवा पुरविणे तसेच शहरातील कर्करोगावर नियंत्रण मिळविणे हे आहे.

 

केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया यांसारख्या सामान्य (Thergaon )कर्करोगाच्या उपचारांव्यतिरिक्त, रुग्णालय समुपदेशन आणि पुनर्वसन यांसारख्या सहाय्यक सेवाही या रुग्णालयात पुरविण्यात येणार आहेत.

 

हे रुग्णालय स्तन, फुफ्फुस, कोलोरेक्टल, प्रोस्टेट आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाची पूर्तता करण्यासाठी सुसज्ज असणार आहे. या रुग्णालयात देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचे दर महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना (MJPJAY) तसेच केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) दरांशी संरेखित केल्या जाणार आहेत, ज्यामुळे सर्वांना अल्प दरात उपचार उपलब्ध होणार आहेत.

रुग्णालयात असणार अत्याधुनिक आरोग्य सुविधा
रुग्णांना उपचाराच्या अत्याधुनिक पर्यायांचा वापर करता येईल याची खात्री करण्यासाठी रूग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. यामध्ये लिनियर एक्सीलरेटर्स, ब्रेकीथेरपी युनिट्स आणि पीईटी-सीटी स्कॅनरची सुविधाही रुग्णांना देण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिका सतत कार्यरत आहे आणि शहरातील नागरिकांना शक्य तितकी सर्वोत्तम सेवा अल्प दरात पुरविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.
शेखर सिंह,
आयुक्त तथा प्रशासक,
पिंपरी चिंचवड महापालिका

नवीन थेरगाव रुग्णालयात उभारण्यात येणार कॅन्सर रुग्णालय

महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांमध्ये तृतीय श्रेणी तसेच दुय्यम श्रेणी रुग्णालये आणि दवाखाने यांचा समावेश होतो. प्रस्तावित कॅन्सर रुग्णालय नव्याने बांधण्यात आलेल्या थेरगाव रुग्णालयात उभारण्यात येणार आहे. थेरगाव रुग्णालयाची खाटांची क्षमता सध्या 200 खाटांची आहे.
डॉ. लक्ष्मण गोफणे,
आरोग्य वैद्यकीय अधिकारी,
पिंपरी-चिंचवड महापालिका

प्रस्तावित कर्करोग रुग्णालयाची ठळक वैशिष्ट्ये !

केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया यांसारख्या सामान्य कर्करोगाच्या उपचारांव्यतिरिक्त, रुग्णालय समुपदेशन आणि पुनर्वसन यांसारख्या सहाय्यक सुविधा असणार.

 

Pune: यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वांगीण विकासामुळे आजचा आधुनिक महाराष्ट्र उभा- डॉ. राजा दीक्षित

स्तन, फुफ्फुस, कोलोरेक्टल, प्रोस्टेट आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगांवर उपचार होणार

आरोग्य सेवांचे दर महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना (MJPJAY), केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) दरांशी संरेखित केले जातील, ज्यामुळे अल्प दरात उपचार उपलब्ध होणार

कर्करोग रूग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल, ज्यामध्ये लिनियर एक्सीलरेटर्स, ब्रेकीथेरपी युनिट्स आणि पीईटी-सीटी स्कॅनरचा समावेश असणार

34, 848 चौरस फुटांमध्ये उभारण्यात येणार कर्करोग रुग्णालय
रुग्णालयासाठी 4 मजली प्रशस्त सार्वजनिक पार्किंग सुविधा देण्यात येणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.