Pune: यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वांगीण विकासामुळे आजचा आधुनिक महाराष्ट्र उभा- डॉ. राजा दीक्षित

एमपीसी न्यूज –  आधुनिक महाराष्ट्राचे आदर्श नेतृत्व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी (Pune)केले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाया त्यांनी रचला. साहित्य, संस्कृतीसह सर्वांगीण कार्य त्यांनी जोपासले त्यांच्यामुळेच आजचा आधुनिक महाराष्ट्र दिसतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र  राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.

 

 

स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगालॉज मित्र मंडळातर्फे पहिले मुख्यमंत्री, लोकनेते स्व. यशवंतराव  चव्हाण यांच्या (Pune)जयंतीनिमित्त  यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार समारंभात कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ मराठी अभिनेते विलास रकटे यांना मराठी विश्वकोश  राज्य निर्मिती मंडळाचे अध्यक्ष  राजा दीक्षित यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात  प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

Dehugaon : जल प्रदूषण वाढले; इंद्रायणीकाठी पुन्हा एकदा मृत माशांचा खच

याप्रसंगी अनिल धाकू कांबळी (कणकवली) यांना ‘इष्टक’ या कवितासंग्रहासाठी कै. शिवाजीराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्कार’, कवी भीमराव धुळूबुळू (मिरज) यांना ‘काळजाचा नितळ तळ’ या कविता संग्रहासाठी कै. बाबासाहेब जाधव यांच्या स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्कार’ , कवी गीतेश गजानन शिंदे (ठाणे) यांना ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ या कविता संग्रहासाठी कै. धनाजी जाधव स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.  मसपाचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, जेष्ठ लेखक व कवी प्रा. फ.मु. शिंदे, अशोक नायगावकर , माजी उपमहापौर दत्ता धनकवडे, ट्रस्टचे विजय ढेरे, संजय ढेरे, गौरव फुटाणे, सचिन जाधव यावेळी उपस्थित होते.

 

डॉ. राजा दीक्षित म्हणाले, यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. सत्तेचे विकेंद्रीकरण, सहकार चळवळ, सुसंस्कृत राजकारणासाठी त्यांची ओळख आहे. त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. त्यांचे कार्य अतुलनीय आहे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

 

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, आधुनिक महाराष्ट्र केवळ यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यामुळे होऊ शकला. त्यांनी आपले सर्व जीवन महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केले. सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ अभिनेते विलास रकटे म्हणाले, यशवंतराव चव्हाण व पंतप्रधान पंडित नेहरू यांनी प्रेक्षक गृहामध्ये येऊन नाटक पाहिले. या आठवणीला उजळला देत त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य, कला त्यांनी जोपासली म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलो,अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

 

व्यथा गोंजारली होती, मरण कवटाळले होते, तुला आम्ही टाळले नव्हते.…, याद येता तुझी मैना…,दिस जाई, सांज ढळे दूर कोठे उरे.., सांग रंग लावू कोणता,रंग रंगाचा सोडून द्या रे दंगा रंग लावू कोणता…,आभाळी नाही पाण्याचा थेंब…, जिणं फटातय…,म्हणून मी गाव सोडलं…, अशा वास्तव जीवनावर कविता सादर करुन श्रोत्यांना अंतर्मुख केले. सध्याच्या कोलमोडून पडलेल्या राजकीय परिस्थितीवर कवीनीं आपली कविता सादर करुन लोकशाही जीवंत ठेवण्याचे आवाहन कवि संमेलनातून केले. श्रोत्यांनी यावेळी कविसंमेलनाला भरभरुन दाद दिली.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सत्कारानंतर राज्यभरातून आलेल्या प्रख्यात कवींचे कवी संमेलन रंगले.

 

गेली 36 वर्षांपासून यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळा कवी संमेलन अविरतपणे होत आहे. दरम्यान कवी संमेलनाला श्रोत्यांची तुडुंब गर्दी झाली होती.

 

चार पुरस्कार विजेते कवींसह अनिल धाकू कांबळी, भीमराव धुळुबुळू, गीतेश शिंदे, वैशाली पतंगे, प्रशांत मोरे, अंजली कुलकर्णी, विजय पोहनकर, प्रकाश होळकर , भाग्यश्री केसकर,नितीन देशमुख,मृणालिनी कानिटकर, अनिल दीक्षित  यांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, प्रा. फ. मुं. शिंदे व अशोक नायगावकर यांनी कवि संमेलनाचे सूत्रसंचालन केले. यावेळी राजकारण, समाजातील व्यथा कवितेतून  केले. तसेच आपल्या खास भाषेतून कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. टिळक स्मारक मंदिर श्रोत्यांनी तुडुंब भरले होते. नितीन देशमुख यांनी यशवंतराव ही कविता सादर करून कवी संमेलनाची सुरुवात केली.

 

रामदास  फुटाणे यांनी’ जरा अंगी येता, समाजाचे बळ  भुजा तिल बळ दर्शविति’ ही सद्य स्थिती वर सादर केली. ज्येष्ठ कवी फ. मु .शिंदे यांनी’ टाहो हुंदक्यास देतो त्यांचे अनावर स्वर, विदूषकाचे  काळीज दुःख वेदनाचे घर’ ही वेदना सादर केली.

 

कवी विजय पोहनकर यांनी सादर केलेल्या शेतकऱ्यांची परिस्थितीमुळे डासराव खेडे सोडून शहरांमध्ये स्वच्छ वस्तीत जातो या कवितेला श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. कवि  अनिल धाकू कांबळी यांनी आई आणि तरुण मुलगा मरण मागणारा यांचा होणारा संवाद  आपल्या कवितून मांडला. प्रशांत मोरे यांनी ‘ बाई फुफाटा फुफाटा  बाई ग, शेतीमातीच्या शहरात  गेल्या वाटा ग ‘ ही शेतकर्‍यांच्या अस्मानी संकटामुळे दुष्काळी परिस्थितीवर सल कवितेत सादर केली.

 

प्रकाश होळकर यांनी ‘आभाळी नाही पाण्याचा थेंब – शिवारी जळाला मातीचा कोंब ही रचना सादर केली.  कवी गितेश शिंदे यांनी ‘ओझोनची छत्रीही शिवून घेऊ, झाडांच्या सालींनी अथवा आकाशालाच फासू सनस्क्रीन लोशन ‘ ही कविता सादर केली.

 

गझल, प्रेमगीते, राजकरण्यांवर विडंबन कविता सादर करत उत्तोरात्तर कार्यक्रम संमेलन रंगत गेले. त्याचबरोबर कवि रामदास फुटाणे व अशोक नायगावकर यांच्या खास शैलीतील किस्यात श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

 

कवयित्री वैशाली पंतगे यांनी ब्रेकअप या कवितेद्वारे तसेच भाग्यश्री केसकर आणि अंजली कुलकर्णी यांनी महिलांच्या समस्या, व्यथा आणि स्वाभिमान त्याच्या रचनांतून मांडल्या.  रोजच्या जीवनातील व्यवस्थापनावर त्यांनी भाष्य केले.  अनिल दीक्षित यांनी राजकारणी पत्रातून जनतेला काय मागणी करतो त्यांच्या विडंबन कवितेतून सादर केले. अनेक कवीनीं राजकीय त्याच्या व्यंगावरील कवितेने रंग भरला.

 

या कवितेला रसिकांची चांगली दाद मिळाली. कवि संमेलनात कवींनी एकाहून एक सरस कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.  कवयित्रींकडून स्त्रियांच्या जिव्हाळा, निसर्गसौंदर्य, प्रेम-विडंबन, अशा अनेक विषयांना स्पर्श करत कवींनी रसिकांना खिळवून ठेवले होते. तर निसर्ग व प्रेम कवितांच्या सादरीकरणाने कवीनीं श्रोत्यांची वाहवा मिळवली.  कवि  अशोक नायगावकर यांनी  ‘ओनरशिप जेल’ या संकल्पनेवर आपल्या खास शैलीत कविता सादर करुन कार्यक्रमाचा समारोप केला. या कवी संमेलनास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कवितेचा आस्वाद घेतला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.