Pune: मनसे पक्ष संपविण्याचे काही पदाधिऱ्यांकडून प्रयत्न – वसंत मोरे 

एमपीसी न्यूज – मनसे पक्ष संपविण्याचे प्रयत्न काही पदाधिकाऱ्यांकडून होत (Pune)असल्याचा आरोप मनसेचे खंदे नेते असलेल्या वसंत मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मी लोकसभेसाठी इच्छूक होतो.
हे मी दोन वर्षांपासून वारंवार सांगत आलो आहे. मी जर इच्छूक होतो तर (Pune)पुण्यातील पक्ष संघटनेने राज ठाकरेंकडे नकारात्मक अहवाल का पाठवला? असा सवाल मोरे यांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला. मी कोणत्याही पक्षाच्या ऑफरसाठी मनसेचा राजीनामा दिलेला नाही. मनसेमध्ये वातावरण चांगलं नसतानाही मी त्या पक्षात होतो.

त्यामुळे इतर पक्षांकडून ऑफर आली म्हणून मी बाहेर पडणारा कार्यकर्ता नाही. मी सामान्य पुणेकरांसाठी लोकसभा निवडणूक लढविणार आहे, असेही मोरे यांनी सांगितले.

Dehugaon : जल प्रदूषण वाढले; इंद्रायणीकाठी पुन्हा एकदा मृत माशांचा खच

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटीलदेखील उपस्थित होत्या. तुम्ही वसंत मोरेंसाठी काही प्रस्ताव आणला आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, माझी ऑफर मी कालच त्यांना दिली आहे. अजित पवार आणि मोरे यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे ते दोघं यावर निर्णय घेतील. दरम्यान, संजय राऊत यांनी मोरे यांच्या राजीनाम्याबाबत चांगली प्रतिक्रिया दिली. त्याबद्दल मोरे यांनी राऊत यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.