Chinchwad : तडीपार गुंडासह तिघांना अटक

एमपीसी न्यूज – चिंचवड पोलिसांनी एका तडीपार गुंडाला(Chinchwad) शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक केली. त्याच्या दोन साथीदारांना देखील अटक करत तिन्ही आरोपींकडून शस्त्रासह एक लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
सुनील मारुती लोणी (वय 23, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे (Chinchwad)अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याच्यासह प्रथमेश मुकुंद मोदी (वय 22, रा. रुपीनगर, तळवडे), सौरभ दत्तात्रय शिंदे (वय 23, रा. बळवंत नगर, चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागसेननगर झोपडपट्टी येथे एक तरुण संशयितपणे थांबला असून त्याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित तरुण पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि रोख रक्कम असा 47 हजार रुपये किमतीचा ऐवज आढळून आला.
त्याच्याबाबत चौकशी केली असता त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपार केल्याचे उघडकीस आले. आरोपी सुनील याने त्याच्या दोन साथीदारांसह मिळून चार ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोन साथीदारांना देखील अटक केली. तिन्ही आरोपींकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतूस, तीन मोबाईल फोन, नऊ घड्याळे, नवीन कपडे आणि परफ्युम असा एकूण एक लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन आणि वाकड पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.