Pune: भारतीय तत्त्वज्ञान पूर्णत्वाकडे नेणारे आहे –  धनश्री लेले

एमपीसी न्यूज –  स्त्री – पुरुष हा भेद निर्मितीसाठी आहे. चैतन्याला (Pune)निर्मितीसाठी प्रकृतीची अपरिहार्य आवश्यकता असते. तिच्याशिवाय तो निर्मिती करू शकत नाही. मात्रअखेरीस पूर्णत्वासाठीच ते एकत्र येत असतात. भारतीय तत्त्वज्ञान प्रत्येक जीवाला पूर्णत्वाकडे नेणारे आहेअसे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्यात्याविदुषी धनश्री लेले यांनी केले. रूपगुणनाम हे भेद वरवरचे आहेत. अंतिम तत्त्व कैवल्याचे आहेअसेही त्या म्हणाल्या.

 

हिंदू महिला सभा, पुणेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नवी पेठेतील (Pune)एस एम जोशी सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी धनश्री लेले यांना विदुषी डॉ कल्याणीताई नामजोशी यांच्या हस्ते ‘शब्दव्रती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

BJP : माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती

सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, धनादेश, महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अग्निशमन दलातील पहिल्या महिला फायरमन मेघना सकपाळ यांचा ही याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला. हिंदू महिला सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले यांनी धनश्री लेले यांच्याशी संवाद साधला.

 

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात धनश्री लेले यांनी आपल्या जडणघडणीविषयीचे विवेचन केले. ‘बालपणापासून आईसोबत ऐकलेली व्याख्याने, कीर्तने, प्रवचने, व्याख्यानमाला आणि वाचनाचे वेड, यातून बोलण्याची सवय विकसित होत गेली. सुरुवात निवेदनापासून झाली.

 

अनेक मान्यवर कलाकारांसोबत शेकडो कार्यक्रम केले. मात्र या काळात आपल्याला स्वतःला स्वतःचे काही सांगावेसे वाटते आहे, याची स्पष्ट जाणीव झाली आणि मी निवेदनाकडून व्याख्यानांकडे वळले’, असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदू महिला सभेच्या कार्याची माहिती देणारी दृकश्राव्य फीत दाखवण्यात आली. वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.