BJP : माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती

एमपीसी न्यूज –  भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी स्वीकृत (BJP)नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेडगे यांना प्रदेश (BJP)कार्यकारिणीवर नियुक्त करण्यात आल्याचे पत्र सुपूर्द केले. ॲड. शेडगे हे गेली अनेक वर्षे पक्षाच्या बांधणीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.

 

Pimpri: ड्रेनेज मध्ये अढळले मृत पुरुष जातीचे अर्भक, पिंपरीतील धक्कादायक प्रकार 

त्यांना प्रदेश कार्यकारणीवर घेऊन भारतीय जनता पार्टीने काहीअंशी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शेडगे हे बालपणा पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून संघदृष्ट्या प्रथम वर्ष शिक्षित आहेत.
महाविद्यालयीन जीवनात आखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे 5 वर्षे सक्रिय कार्य केले आहे. भाजप युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष,  मंडल अध्यक्ष, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष,  भाजयुमो प्रदेश सचिव, भाजयुमो पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष, जिल्हा महामंत्री असा पक्षाच्या  संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=tnaCrgfh7Qc&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.